निलेश श्रीकृष्ण अढाऊ (कलाकार)
संस्थापक आणि संचालकमी कलाकार आर्ट चा संस्थापक आणि संचालक मागील 15 वर्षापासून मी ग्राफिक्स डिजाईन क्षेत्रात कुशलतेने कार्य करीत आहे. आता पर्यंत असंख्य बॅनर, ग्राफिक्स, पोस्टर तयार करून ग्राहकांना दिले आहेत.
कोणत्याही प्रकारचे ग्राफिक्स, बॅनर, पोस्टर,सोशल मेडीया पोस्ट करीता संपर्क करा.
ग्राहक अभिप्राय
कलाकार आर्ट – कडून ग्राफिक्स तयार करून घेतलेल्या ग्राहकांचा अभिप्राय आपणास येथे पाहावयास मिळेल.
प्रा.सागर पाडिया
भूमि पब्लिकेशन, तेल्हाराभूमि पब्लिकेशन च्या स्थापने पासून तर आता पर्यन्त सर्व कामे (लोगो व कवर डिज़ाइन) कलाकार आर्ट्सनेच बनाविले आहे. या सर्व डिज़ाइनचा आम्हच्या सर्व ग्राहकाकडून खुप प्रशंशा होते.
सागर पाडिया, भूमि पब्लिकेशन, तेल्हारा
प्राध्यापक,डॉ. के .अ.माहुरे
प्राध्यापक, डॉ.गो.खे.महाविद्ययालय, गाडेगाव तेल्हाराकलाकार आर्ट वेगवेगळ्या डिझाईनसाठी खुप छान ठिकाण आहे. कमीतकमी वेळात आणि उत्कृष्ट अशी डिझाईन तयार करण्याचा कलाकार आर्टचा नावलौकिक आहे. तेल्हारा सारख्या छोट्याशा शहरात अशी सुविधा उपलब्ध झाल्याने आम्हा ग्राहकांना त्याचा खूप फायदा झाला आहे. अनेक वेळा त्यांच्या कडे डिझाईनची कामे केली तेव्हा त्यांचा प्रेमळ स्वभाव दिसून आला. संचालक श्री निलेश अढाऊ यांची ग्राहकांसोबत प्रेमळ वागणूक मनाला भावणारी आहे. त्यामुळे त्यांच्याशी एक आपुलकीचे नाते निर्माण झाले. सेवा परमो धर्म या पद्धतीने कलाकार आर्ट काम करत आहे. आपल्या उत्कृष्ट सेवेबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
अतुल निमकर्डे
एम ए मराठी , ए टी डी तथा संचालक मोहन हॉटेल, बेलखेडकला हे मानवाला देवाने दिलेले वरदान आहे !
आजच्या डिजिटल युगात कलेला जोपासून एक नवे विश्व नवी ओळख ' ' कलाकार आर्ट ' ' या नावाने उभी केली आहे , उत्तम कलासूचक्ता आणि नियोजन कलाकार आर्ट चे वैभव आहे , नावीन्यपूर्ण योजनाची कल्पकता ही नेत्रदीपक आहे , संचालक निलेश अढाऊ यांचे शी माझा अनेकदा संपर्क आला आणि प्रत्तेकदा त्यांच्या स्वभाव आणि त्यांच्यातील आपुलकीने त्यांनी भारावून सोडलं , हाही त्यांचा एक महत्वाचा गुण आहे त्यांच्या ह्या कलाकार आर्ट ला खुप शुभेच्छा !
श्रीकांत बोरसे
Founder: SHRITEC Technologiesकलाकार आर्ट नेहमीच ग्राहकांना आकर्षक ग्राफिक्स तयार करून देतात. मी कलाकार आर्ट कडून नेहमी ग्राफिक्स तयार करून घेत असतो, त्यांचे सर्विस ने मी समाधानी आहे.
अब्दुल हकीम
कवि रा.कानडगाव ता. अंबड जिल्हा जालनाकवितासंग्रह म्हंटला की मुखपृष्ठ खूप महत्वाचे. माझ्या स्नेहांकीत शब्द सारे,आक्रोश लेखणीचा,बोलकी लेखणी,संघर्षयात्री,परवड कास्तकारांची या सर्व कविता संग्रहांचे मुखपृष्ठ निलेशजी कलाकार यांनी अतिशय सुंदर प्रकारे रेखाटले. “आक्रोश लेखणीचा” हे मुख्यपृष्ठ इतके बोलके होते की ते बघितल्यावर आपल्याला संग्रहाची कल्पना येते. आजवर गुगलवर 35000 पेक्षा जास्त वाचकांनी हा संग्रह वाचला/बघितला आहे. त्याची लिंक सोबत जोडली आहे. आजही बरेच वाचक तो संग्रह गूगल सर्च करून वाचतात आपणही पहावे व वाचावे. http://www.readwhere.com/read/1157074/Aakrosh-Lekhanicha- तूर्तास मी त्यांना खूप - खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.
निशांत सुभाषराव सदाफळे
आपणा मध्ये असलेल्या विशेष X FACTOR हा आपण करत असलेल्या कामाला विशेष बनवतो. मला येत असलेला अनुभव म्हणजे आपण करत असलेले काम हे फक्त पैसा कमविणे करिताच नसुन काम सर्वात BEST कसे होईल या वर आपला नेहमी प्राधान्य राहिले. त्यामुळे आपण बनवत असलेल्या वेबसाईट चा व आपण करत असलेल्या उद्याेेेेेेगाचा ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे हे नक्की.......
गजानन आकारामभाऊ गायकवाड
शहर उपाध्यक्ष भाजपाकलाकार आर्ट ने आमच्या उपक्रमांचे, उत्सवांचे, भाजपा तर्फे आयोजीत कार्यक्रमांचे, अत्यंत सुंदर आणि आकर्षक बॅनर तयार करून दिलेले आहेत. आम्ही त्यांचे सेवेने समाधानी आहोत.